उद्योग व व्यापार मध्ये येणाऱ्या समस्या यांची बैठक घेऊन पक्षसंघटन वाढवणे, जीएसटी संदर्भातील प्रश्न सोडवून पर्यावरण पूरक मच्छी उद्योग व व्यापार व्यवसायाला चालना देणे, तरुण वर्गांना महामंडळामार्फत इन्कम सोर्स उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी देणे,
वेबसाईट उपलब्ध करून पुणे शहर जिल्हा व्यापारात अग्रगण्य असल्याने जंबो कार्यकारणी तयार करणे बाबत आदि याविषयी माननीय श्री प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण याची कार्यकारणी नुतन पदाधिकार्यांचे नियुक्त करून पक्ष संघटन बळकट करणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यत पोहचवणे यासंदर्भात पुणे येथे उद्योग व व्यापार यांची आढावा बैठक घेण्यात आली
यावेळी बाळासाहेब सरगर, भोला सिंग वरोरा, उद्योग-व्यापार सेल पुणे माजी शहराध्यक्ष वीरेंद्र साहेब, उद्योग-व्यापार सेल पुणे शहर महेश हांडे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयवंतरावजी पाटील साहेब यांची पुणे येथे भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उद्योग व्यापारी वर्गाचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्ष माननीय नागेश फाटे यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे उपस्थितीत सादर केला यावेळी यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण चव्हाण, संचालक दिनकर पाटील, विलास देठे, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ आदी उपस्थित होते
यावेळी नागेश फाटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा खानदेश विदर्भ मराठवाडा या विभागाचा दौरा करून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन अडचणी जाणून घेतल्या व त्यांचा कार्य अहवाल ही सादर केला तसेच पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्या करता पंढरपूर तालुक्यांमध्ये एमआयडीसीची स्थापना करणेबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जणू काही याचा विडाच उचलल्याचे या वरून दिसत आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…