शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवार आमचे नेते होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, असा घणाघातही त्यांनी केला आहे.केवळ तडजोड महाविकास आघाडीत असल्याचेही अनंत गीते म्हणाले आहेत.
अनंत गीते पुढे म्हणाले की, दुसरा कोणताही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण तो आमचा गुरु होऊच शकत नाही, बाळासाहेब ठाकरेच फक्त आमचे गुरु होते आणि राहतील. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय?
काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, त्यांचे एकमेकांशी कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? एक विचारांची दोन काँग्रेस होऊ शकत नाही, तर काँग्रेस विचारांची शिवसेना ही कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असल्याचे ते म्हणाले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…