सांगोला तालुक्यात समृद्धी ट्रॅक्टर्सचा नूतनीकरण समारंभ सांगोल्याचे आमदार श्री.शहाजीबापू पाटील, मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, युवा नेते श्री.बाबासाहेब देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मा. आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, जि.प.सदस्य अतुल पवार या प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर शेतकरी हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. समृद्धी ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगोला येथील शोरूम नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिकमान उंचवण्यासाठी ग्राहक हाच आपला मुख्य मानून समृद्धी ट्रॅक्टर कार्यरत आहे. देशात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकावर समृद्धी ट्रॅक्टर अग्रेसरवर असून पुढील काळातही सेवा देण्याचे काम करीत राहील असा विश्वास धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्री.श्रीकांत देशमुख, जि.प.सदस्य श्री.अतुल पवार, व्हा.चेअरमन श्री.विश्वनाथ चव्हाण, जेष्ठ संचालक श्री.शहाजी नलावडे, सोनालिका ट्रॅक्टरचे श्री.बलजिंदर सिसोदिया सर, श्री.सुबोधकुमार शर्मा सर, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील, संचालक श्री.अभिजीत कदम, श्री.सुरेश सावंत, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, श्री.मोरे, युवा नेते श्री.अभिजीत नलावडे, यासह शेतकरी,ग्राहक मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…