भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद दिले होते.
2003 मध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया (Rajinderpal Singh Bhatia Suicide) यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्याचवेळी त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले होते. 2008 च्या निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. 2013 मध्ये सुद्धा भाटिया यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांनी दुसऱ्या स्थान पटकावले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राजनादगांव येथील छुरिया भागात आपल्या भावासोबत राहत होते. रविवारी संध्याकाळी ते घरी एकटेच होते. कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी खोली गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रजिंदरपाल भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. आपल्या प्रकृतीबद्दल ते चिंतातूर होते.
भाटिया यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी कुटुंबीयांशी चौकशी केली असून अधिक तपास करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी रजिंदरपाल सिंह भाटिया यांच्या आत्महत्येवर व्यक्त केलं दु:ख
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रजिंदरपाल सिंह भाटिया यांच्या निधनावर दुख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दुखाच्या प्रसंगी अधिक बळ मिळो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असं बघेल म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…