भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानं पाकिस्तानचा तीळपापड झालाय. पाकचा घुसखोरीचा प्लॅन फसतोय. सीमेवरही भारतीय सैन्यापुढे निभाव लागत नसल्यानं आता पाकिस्तान ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून भारताची हेरगिरी करू पाहतोय.
मात्र सुरक्षायंत्रणांनी पाकिस्तानची हाही डाव हाणून पाडलाय.
भारताविरोधात कुरापती करणा-या पाकिस्तानचा आणखी एका नापाक डाव उधळला गेलाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं सैन्यदलाची माहिती मिळवण्यासाठी हनी ट्रॅप लावल्याचं समोर आलंय.
या हनी ट्रॅपची जबाबदारी रावळपिंडीतल्या तरूणींवर सोपवण्यात आलीय. याप्रकरणी जयपूरमधून दोन तरूणांना अटक करण्यात आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार ISIच्या तरूणींनी त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याकडून सैन्य दलाची महत्वाची माहिती गोळा केली.
ही माहिती ISI एजंटला पुरवण्यात येत होती. मिलिटरी इंटेलीजन्सला याची माहिती मिळताच राजस्थान पोलिसांसह संयुक्त कारवाई करत त्यांनी या दोघांना अटक केलीय.
भारतीय सैन्यदलाविषयी महत्वाची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्ताननं याआधीही हनीट्रॅपचा प्रयोग केलाय. मात्र त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी झालेले नाहीत. असे कुटील डाव खेळून पाकिस्तानच्या हाती काहीच लागणार नाही.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…