मुंबई – पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. औरंगाबादेत युतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्याबाबत विचारले असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही, अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे.
तसेच मंत्री बनण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असे सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असेही राणे म्हणाले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…