एखाद्या आठवड्या-पंधरवड्यात एखादा तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,कोतवाल यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केल्याची बातमी नाही आली कि या राज्यातील जनतेलाही आता काही तरी चुकल्या सारखे वाटत असते, इतकी टोकाची लाचखोरी फेरफार नोंदी आणि सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी या राज्यात होते कि काय असा प्रश्न कायम जनतेला पडलेला असतो.राज्यात लाच लुचपत विभाग वेळोवेळी कारवाई करत असताना देखील लाचखोरीचा हा प्रकार काही थांबताना दिसून येत नाही.एकूणच लाच लुचपत विभागाने सापळा रचून कारवाई करूनही या प्रकरणी प्रत्यक्ष कोर्टखटल्यात निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठे असल्याच्या करणाचीच चर्चा होते.
लाच स्वीकारण्यात महिला कर्मचारीही मागे नसल्याचे दिसून येत असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका तक्रारदाराच्या आजोबाच्या निधनानंतर वडील आणी काकाचे नाव सात बारा उताऱ्यावर नोंद धरण्यासाठी तलाठी स्वाती झुरळे यांनी कोतवाल संदीप तांबे यांच्यामार्फत ४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…