छोट्या पडद्यावरील एका मालिकेतून भगवान गौतम बुद्ध यांचा अवमान झाल्याने वाद निर्माण झाला होता. पण, त्यावर मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.स्टार प्रवाह या वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेशी निगडीत हे प्रकरण आहे.
या मालिकेतील एका व्यक्तिरेखेने भगवान गौतम बुद्धांचा चेहरा असलेली वेशभूषा केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.त्या वादावर मालिकेचे निर्माते, ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे.
ते म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांचा आपण आदर करतो. ही चूक अनावधानाने घडली आहे. तरीही कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचली असल्यास मी जाहीर माफी मागतो आणि यापुढे असं होणार नाही, याची ग्वाही देतो, असं कोठारे यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला असून त्यांची माफी स्वीकारल्याचं म्हटलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…