ताज्याघडामोडी

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला; मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा

तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती.  मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम फरार आरो्पीचा शोध घेत होत्या. आरोपीची ओळख पटवणं सोपं व्हावं, यासाठी हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago