आत्महत्येचा प्रयत्न आणि दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल
मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी करकंब पोलीस ठाण्यात थरारक प्रकार घडला असून सकाळी 09/52 वा सुमारास पोलीस ठाणेस समोर गेटमधुन टाटा कंपनीची छोटा हत्ती एम एच 13 सी यु 7745 ही टमटम पोलीस ठाणे आवारामध्ये थांबली त्यामधुन मेंढापुर गावचे रहीवाशी असलेले पप्पु थोरात याने प्लस्टीकचे कन हातामध्ये धरुन उतरले.त्यानंतर पप्पु थोरात व ड्रायव्हर विकास झेंडे असे मिळुन त्यांचे हातामध्ये केसरी रंगाच्या बाटल्या घेवुन गाडीच्या पाठीमागे ते दोघे पाठीमागे जावुन मागुन काही लोकांना उतरविले त्यावेळी त्यांचे हातामध्ये केसरी रंगाच्या बाटल्या घेवुन ते पुढे येवु लागले असता पप्पु बाळु थोरात त्यांचे हातामध्ये कोयता व प्लस्टीकचा कन, तसेच त्याचा भाउ सचिन बाळु थोरात याने त्याचे हातामध्ये केसरी रंगाची प्लस्टीकची बाटली , तसेच ताई बाळु थोरात त्याचे हातामध्ये केसरी रंगाची प्लस्टीकची बाटली,बाळु शंकर थोरात त्याचे हातामध्ये केसरी रंगाची प्लस्टीकची बाटली असे मिळुन त्यांचे कुटुंबियासमवेत मुल बाळांसह पोलीस ठाणेच्या इमारती समोर आले.
सर्वजण करकंब पोलीस ठाणेचे इमारतीजवळ येताच आम्हाला न्याय दया आम्ही आता मरतो असे म्हणुन आरडा ओरड करु लागले त्यावेळी पप्पु बाळु थोरात याने त्याचे हातामधील प्लस्टीकच्या कॅन उघडुन डाव्या हाताने अंगावर ओतुन घेवुन पेट्रोल अंगावर टाकुन घेत उजव्या हातामध्ये कोयता घेवुन आता आम्ही सर्वजण मरतो आम्हांला न्याय मिळत नाही असे म्हणत आरडाओरड केली.तसेच त्याने त्याचेजवळील प्लस्टीकचा कनमधील पेट्रोल त्याची आई ताई थोरात व लहान मुलाचे पेट्रोल अंगावर ओतुन आपण मरु असे म्हणत त्याचा भाउ व वडीलांनाही अंगावर पेट्रोल ओतुन घ्या असे म्हणु लागला.त्याचवेळी सचिन बाळु थोरात यानेही त्याचे हातामधील प्लस्टीकची बाटलीतुन पेट्रोल त्याचे अंगावर ओतुन घेण्याचा प्रयत्न करुन आरडाओरड करुन लागले.
तसेच ताई बाळु थोरात यांनीही त्यांचे हातामधील प्लस्टीकची बाटलीतुन पेट्रोल त्याचे अंगावर ओतुन घेण्याचा प्रयत्न करीत आता आम्ही मरतो असे म्हणुन आरडाओरड करु लागले तसेच बाळु शंकर थोरात यांनीही त्याचे हातामधील प्लस्टीकची बाटलीमध्ये पेट्रोल घेवुन आता आम्ही मरतो असे म्हणुन आरडाओरड करु लागले. त्यानंतर पोलीस ठाणेमधील पोलीस कन्स्टेबल/526 एकतपुरे व पोना/369 गव्हाणे यांनी पाहताच इतर पोलीसांना आरडाओरड करीत बोलावुन घेवुन पप्पु थोरात याचे हातामधील कोयता व पेट्रोलचा कॅन हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करु लागले. पो.ना. शेटे यांनी त्यास समजावुन सांगणेचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता. त्याचवेळी प्रसंगावधान दाखवुन त्याचे पाठीमागुन स.फौ. कवितकर यांनी त्यास पाठीमागुन येवुन त्याला पाठीमागुन मिटी मारुन धरले.
त्यानंतर पप्पु थोरात याने पोलीस जवळ येवु नये म्हणुन त्याचे हातामधील कोयता दोन वेळा वेगाने फिरवुन दहशत निर्माण केली. त्यानंतर लगेच स. पो.नि.तारु,पो.उप.नि./अजित मोरे,पो.ह.जाधव,पो.ना.गव्हाणे,पो.ना.खांडेकर,पो.ना.एकतपुरे,पो.ना. लेंगरे, पो. ना.हजारे,होम.धोत्रे,कसबे, महीला होम/सरवदे, महीला होम/चैगुले व महीला होम/क्षिरसागर यांनी सर्वांना घेराव घालुन त्यांना पोलीस बळाचा वापर करु ताब्यात घेतले.
1)पप्पु बाळु थोरात,वय -32 वर्शे,व्यवसाय -मजुरी 2)सचिन बाळु थोरात,वय -34 वर्शे ,व्यवसाय -मजुरी 3) बाळु षंकर थोरात,वय -60 वर्शे,4)ताई बाळु थोरात,वय -55 वर्शे,व्यवसाय – मजुरी सर्व रा.मेंढापुर 5)विकास शिवाजी झेंडे,वय -32 वर्शे,व्यवसाय-ड्रायव्हर रा.मेंढापुर यांनी मिळुन करकंब पोलीस ठाणे समोर दिनांक 14/09/2021 रोजी 09/54 वा सुमारास त्यांनी आम्हांला न्याय मिळत नाही म्हणुन करकंब पोलीस ठाणेचे इमारतीसमोर अंगावर पेट्रोल ओतुन घेवुन स्वतला पेटवुन घेवुन व कोयत्याने मारुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करुन व इसम पप्पु थोरात याने हातामध्ये कोयता घेवुन दहषत माजविण्याचा माजवुन गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा केला या आरोपाखाली भारतिय दंड संहीता कलम 309,141,143,147,149 सह षस्त्र अधिनियमचे कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.