सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते.
मात्र आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास करून फिगर काढत असतात.यातील तज्ञ् असलेल्या ”प्रोफेसर”मंडळींकडून यासाठी करण्यात येणारे बहुमोल मार्गदर्शन काही पेपरमध्ये शनिवार ‘ओपन चॅलेंज” म्हणून छापून येते.आणि आकस्मात धनलाभाच्या हिशोबाने गुंतवणूक करणाऱ्यांना म्हणे ते अतिशय मार्गदर्शनपर ठरते.
मात्र यंदाचा सोमवार अशा अनेक ”गुंतवणूकदारांसाठी” अनलकी ठरला असून नेमके याच दिवशी पंढरपुर शहर पोलिसांनी विविध ८ ठिकाणी कारवाई करत मटका एजंट मंडळींवर कारवाई केली आहे.त्यामुळे सणासुदीच्या दिवसात गुंतवणुकीच्या ८० पट अधिक नफा मिळविण्याचे अनेक ”गुंतवणूकदारांचे” मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
काही वर्षांपूर्वी पंढरपुर शहरात जवळपास प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यात एक असे खोके असायचे ज्या ठिकाणी विक्रीला काहीच नसताना देखील गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी दिसून यायची.मग १९९५ साली राज्यात युती सरकार सत्तेत आले आणि स्व.गोपीनाथ मुंढे गृहमंत्री झाले.तेव्हा ५ वर्षे या राज्यात अशा कुठलाही माल विक्रीस नसलेल्या खोक्यांना टाळे लागल्याचे दिसून आले.पुढे राज्यात आघाडी सरकार आले आणि अशा गुंतवणूकदाराची कुचंबणा काही प्रमाणात थांबली.पण पुढे व्हाट्स अप आणि गुगल पे युग आले आणि ना अशा खोक्यांची आवश्यकता राहिली ना कागदाच्या वापराची(या मुळे कागदाचा वापर कमी झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास थांबला).
परंतु तरीही अडाणी,अशिक्षित लोक या भाग्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या खेळापासून वंचित राहू नयेत म्हणून अशा किरकोळ ”इन्व्हेस्टर” साठी काही मोजकीच ठिकाणे उपलब्ध होती.मात्र हा सारा प्रकार हा महाराष्ट्र जुगार अक्ट कलम 12 (अ) नुसार गुन्हा आहे हे लक्षात घेत पंढरपूर शहर पोलिसांनी सोमवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी कारवाई केली असल्याचे दिसून येते.जुलै महिन्यात पंढरपूर तालुका पोलिसांनी अशीच धडक कारवाई केली होती त्यावेळी पंढरपूर नगर पालिकेच्या राजकारणात मोठे पद भूषविलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याचे नावही पुढे आले होते .मात्र पुढे या बाबत काय झाले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…