गुन्हे विश्व

पत्नी आणि सासूच्या छळास कंटाळून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

पत्नी आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूण बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकाळभोर परिसरातील कदमवाक वस्तीवर घडली आहे. कुटुंबियांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे, घरच्यांसोबत बोलू न देणे असा त्रास या दोघींनी पीडित तरूणाला दिला होता.

या छळाला कंटाळून तरूणाने स्वयंपाकघरात गळफास घेउन आत्महत्या केली. रोहित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी रश्मी आणि सासू लता यांच्याविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रोहित आणि रश्मीचे नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोन महिने झाल्यानंतर रश्मीने रोहितच्या मागे त्याच्या घरच्यांपासून वेगळं राहण्याचा तगादा लावायला सुरुवात केली. यानंतर तिने आणि तिच्या आईने म्हणजेच लता हिने रोहितवर त्याच्या घरच्यांसोबत बोलायचे नाही अशी जबरदस्ती करायला सुरुवात केली. या सगळ्याला कंटाळून रोहितने 10 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago