दात घासल्याशिवाय आपल्या कोणाच्याच दिवसाची सुरुवात होत नाही. पण याच दात घासण्यावरून मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावी राहणाऱ्या अफसाना खान हिच्यासाठी रविवारची सकाळ ही अखेरची ठरली. तिने सकाळी दात घासण्यास सुरुवात केली मात्र तिच्या आयुष्यातला तो अखेरचा दिवस होता. अनावधानानं तिने उंदीर मारण्याचे विषारी औषधे ते पेस्ट म्हणून ब्रशवर घेतलं होतं आणि यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टूथपेस्ट ऐवजी विषारी पेस्टने ब्रश केल्यामुळे त्याच्या वासाने आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने लगेच तोंड धुतलं. पण तोपर्यंत तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलंय तिच्यावर उपचार सुरू होते. पण विष शरीरात पसरल्याने रविवारी संध्याकाळी तिचा दुर्दैवी अंत झाला.
अफसाना ही शिक्षण घेत होती. पण तिचे शिक्षणाचे स्वप्न अर्धवटच राहिले. तिच्यामागे तिची आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असं कुटुंब होतं. तिची आई फळं विकून घर चालवायची. पण तिच्या अशा जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून घरातील विषारी वस्तू सहज हाताला येतील अशा ठिकाणी ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…