आमदार श्रीमंत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने पैशांची ऑफर दिली होती, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती. मात्र मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नको आहेत. तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही, असंही पाटील म्हणालेत.
यावर भाजपनं किती पैशांची ऑफर दिली होती? असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला.त्यावर ते म्हणाले की, आपल्याला पैसे नको तर चांगले पद हवे, असं मी भाजपला सांगितलं. तुम्हाला किती पैसे हवेत, असं भाजपनं विचारलं होतं असंही ते म्हणालेत. पण आपल्याला पैसे नकोत तर जनतेची सेवा करण्यासाठी सरकारमध्ये चांगलं पद द्या असं पक्षाला सांगितलं होतं, असा दावा पाटील यांनी केला.श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कागवड तालुक्यातील ऐनापूर गावात विकासकामांचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…