पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह यमाई ट्रॅकवरून फेरफटका मारून परदेशी नगर कडून पुंडलिक नगर येथील आपल्या घराकडे परतत असताना मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील सुमारे सव्वालाख रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवून नेले आहे.
या याबाबत पंढपुरातील जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर सुभाष माचणूरकर यांनी पंढपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 08/09/2021 रोजी सकाळी 08/30वा. चे सुमारास परदेशीनगर येथील अंतर्गत रोडवर पंढरपुर येथे वृषाली माचणूरकर यांच्या गऴ्यातील 1,20,000 किंमतीचे सोन्याचे मणी मंगऴसुञ कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकलवर येऊन हिसका मारुन तोडुन चोरून नेले असल्याचे नमूद केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…