महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने सदर अधिकारी या महिलेशी सलगी करत होता.
मारहाणीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाजी आव्हाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली, मात्र पोलिसांनी या अधिकाऱ्याविरोधात एनसी दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी महिलेला पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवलं असून पुढील कारवाई सुरु केली आहे.
सदर पीडित महिला बदलापूर परिसरात राहते. एका सामाजिक संस्थेत काम करते. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शिवाजी आव्हाड या इसमाने सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली. स्वतःच्या सामाजिक संस्थेची नोंदणी करून देतो, असं सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. या पीडित महिलेच्या मैत्रिणीला देखील नगरसेविका बनवतो, अस सांगत तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण केलं. त्यानंतर या अधिकाऱ्याने या महिलांना फोन करून कल्याणमधील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं.
अधिकाऱ्याने बोलवल्याप्रमाणे पीडित महिला हॉटेलमध्ये इतर महिलांसह पोहोचली. त्यानंतर संतापलेल्या या महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलांनी शिवाजी आव्हाडला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधिन केलं, मात्र पोलिसांनी सदर अधिकाऱ्याविरोधात एनसी दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांनी कारवाईबाबत पीडित महिलेला जिथे राहता त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल करा, असा सल्ला दिला.
पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र महात्मा फुले पोलिसांनी पीडित महिलेला आज पुन्हा बोलावलं आहे. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पीडित महिलेला पोलिसांनी सांगितलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…