ताज्याघडामोडी

शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना मिळणार लस

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसींची डोस मिळाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

लसीकरणासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाला नेटके नियोजन करून दिले आहे.

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आजवर जिल्ह्यातील १६ लाख १४ हजार २० लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आजवर ५५ वेळा कोविशिल्डची लस १४ लाख २२ हजार ८४० तर २८ वेळा कोव्हॅक्सीनची ८२ हजार ६४० इतके डोस आले. यातून ८ ऑगस्टपर्यंत ११ लाख ७४ हजार ३१० जणांना पहिला तर ४ लाख ३९ हजार ७२० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण लसीकरण १६ लाख १४ हजार ३० इतके झाले आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून एकाच दिवशी ७७ हजार ८४० इतके विक्रमी लसीकरण एकाच दिवसात झाले आहे. एका केंद्रावर जवळपास ८०० ते १२०० डोस देण्यात आले आहेत. यात ग्रामीणमध्ये ६५ हजार ७२१ तर ग्रामीण भागात १२०४९ इतके लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात लसीकरणात टॉप असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न थकता काम केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.

जुलै २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी लसीचा कमी साठा मिळत होता. तो वाढवून द्याव्या. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मी, जिल्हाधिकारी श्री शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्य विभागाकडे डोस वाढवून देण्याबाबत सातत्याने मागणी केली‌ होती, यामुळे जिल्ह्याला जादा लस मिळत आहे.

सोलापूरची तुलना पुण्याशी नकोच

सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आज राज्यामध्ये सर्वाधिक लसींचे डोस सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत. लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. ही समाधानाची बाब आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सतत संवाद साधून सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक लसीचे डोस उपलब्ध करून देण्याबाबत माझा पाठपुरावा सुरूच आहे. पुणे जिल्हा मोठा असल्याने त्या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांकडून सर्वाधिक लसी पुरवल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक लसीकरण होत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरणाच्याबाबतीत सोलापूरची तुलना पुण्याशी करणे योग्य नाही. आगामी काळात निश्चितपणे लसीकरणात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर नक्कीच येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात आधी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे. सोलापूर जिल्हावासियांनी शासनाने सूचित केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घ्यावी. गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 hour ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 hour ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago