शिक्षणाचं माहेरघर समजणाऱ्या पुण्यात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचं कारण देखील तसचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली होती.
वयाच्या अवघ्या १३ वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल ८ ते १० जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान, सदर बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. सदर घटनेने मोठ्या प्रमाणात एकचं खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या अत्याचाराच्या घटनेत रिक्षाचालक सहभागी होता. दरम्यान, आज घडल्लेया बलात्काराच्या घटनेत घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं
सदर घटनेत अत्याचार झालेल्या पिडीतेच वय फक्त ६ वर्षे इतकं आहे. दरम्यान, सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. याचाच फायदा घेत आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आपल्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची माहिती समजल्यानंतर पिडीतेच्या आई-वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबियांनाही सावरण्याचं काम करण्यात येतं आहे
या घटनेवर आता स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपींना थेट फाशीचीच शिक्षा द्या, अशी मागणी काही संतापलेल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबियांनाही सावरण्याचं काम करण्यात येतंय. तसेच पीडितेला न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…