ताज्याघडामोडी

फॅबटेक अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विषयावर वेबिनार संपन्न

सांगोला:  येथील फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स  या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय देशमुख (पीएचडी इन आयआयटी बॉम्बे) हे ऑनलाईन उपस्थित होते. सध्या ते संचालक म्हणून सेंट्रल फॉर इंडस्ट्रियल मॅथेमॅटिकस व भास्कराचार्य प्रतिष्टान पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचे स्वागत प्रा. माधुरी सुरवसे  यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांना फॅबटेक महाविद्यालया बद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. हा वेबिनार संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय  अदाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

   यावेळी बोलताना डॉ. अजय देशमुख यांनी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा वापर केला जात असून यामध्ये कृषी, आरोग्य, औद्योगिक, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय दैनंदिन जीवनामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी नवनवे प्रयोग व कल्पना यांना वाव देऊन या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या माध्यमातून सर्व गोष्टी कशा साध्य करता येतील हे पहिले पाहिजे. एआय  असलेल्या स्मार्ट मशीस्ना मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मशीन लर्निंगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे कार्य करण्याची परवानगी देते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल,ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टिकोनातून डेटा छाननी करणे त्याचे प्रारूप ठरविणे, विश्लेषण करणे सुलभ होते अशी माहिती  यावेळी त्यांनी दिली.

    या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, या कार्यक्रमाचे आयोजक व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स  विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबागौडा संगनगौडर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या सांख्येने ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दुर्गा पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मिलन शेटके यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago