गुन्हे विश्व

पोलीस भरती प्रक्रियेतील ‘मुन्नाभाई’ पकडला

पोलीस भरती परीक्षेत ब्ल्यूटूथ मायक्रो एयरफोनचा वापर करून बाहेरून उत्तरे मागवणाऱ्या परीक्षार्थींला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) असे अटकेतील कॉपी बहाद्दराचे नाव असून मोबाईलला ब्ल्यूटूथच्या साह्याने जोडलेल्या मख्खी एअर फोनद्वारे प्रश्न बाहेर बसलेल्या सतिष राठोडला सांगून त्याच्याकडून उत्तरे मागवत होता. तर सातारा परिसरातील एका केंद्रावर एक अल्पवयीन बोगस परीक्षार्थी देखील पकडला आहे.

पोलीस दलात चालक शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी बुधवारी पात्र विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत शहरातील दहा केंद्रांवर घेण्यात आली. परिक्षेसाठी ३३६० पैकी १४९१ उमेदवारांनी परिक्षा दिली.

मात्र, चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयातील केंद्रावर एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, एस. बी. मांटे, दिनकर सोनगिरे, शिपाई पुरी, बनसोडे आणि सुवर्णा ढाकणे पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी परीक्षार्थी राहुल राठोड हा मोबाईल, मास्टरकार्ड ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाईस आणि ब्लूटुथ मख्खी एअरफोन बाळगताना आढळून आला.

विशेष म्हणजे त्याच्या सहाय्याने प्रश्न बाहेर पाठवून साथिदार सतिष राठोड याच्याकडून उत्तरे मिळवत असल्याचे उघडकीस आले. त्याला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करत आहेत. तर सातारा परिसरातील केंद्रावर पकडलेल्या बोगस परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago