ताज्याघडामोडी

सोलापूर शहर जिल्हा मनसेमय करण्यासाठी कामाला लागा:-मनसे नेते दिलीपबापू धोत्रे (सोलापूर शहर जिल्ह्यातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश)

राज्यात येत्या काहि दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक होणार आहे, या सर्व निवडणुका मनसे लढवणार असून सर्वांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन सोलापूर येथील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केले,,यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो युवकांनी प्रवेश केला.

राज्यभरात मनसेकडून मेळावे आयोजित केले जात आहे,सोलापूर येथील उषा लॉन्स मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता, राज्यातील तीन पक्ष्याच्या महाविकास आघाडी सरकारने आणि केंद्रातील भाजपा सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून दिले, या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून सामान्यांना काहीच दिलासा मिळाला नाही, फायनान्स कंपन्या आणि बँकेकडून होणाऱ्या छळवणूक बाबत सरकारने काहीच केले नाही.

महावितरणकडून अनेक घरगुती तसेच शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्यावर ही सरकार कडून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला नाही,केंद्र सरकारने देखील कोणतेही मदत केली नाही ,खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागले याबाबत देखील केंद्र राज्य सरकारने काही केले नाही असे धोत्रे म्हणाले,त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली, पूरग्रस्तांना मदत केली त्यामुळे जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला, यावेळी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अप्पा करचे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेखे ,उपाध्यक्ष सत्तार सय्यद,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्नि, महिला अध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ,तसेच जिल्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,,,

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago