कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
तसेच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली.राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
रुग्णसंख्या कुठे वाढत आहे ? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लाने पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.
निर्बंध कधीपासून कडक होणार ?
राजेश टोपे यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या बाबतीत गेल्या वेळी 1300 मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती. आता 1400 ते 1500 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे.ऑक्सिजनच्या 450 प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत. उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यान्वित होतील.ज्या दिवशी 700 मेट्रिक टनाच्यावर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरु करु.अशा प्रकारची आधिसूचना (Notification) आरोग्य विभागाने काढली आहे.त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे टोपे यांनी सांगितले.
5 जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक
केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे.एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे.गर्दी करुन नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे.
आज राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण संख्या आहे.त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.त्यामुळे शिस्त पाळावीच लागले, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…