सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. यावेळी प्राचार्य सिकंदर पाटील, वनिता बाबर, शितल बिडवे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 4 सप्टेंबर या दिवशी
विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वर्गावरील तास घेऊन शिक्षकांबद्दल आपला आदर व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. रिया कुमठेकर व कु. सुप्रिया पवार या दोघींनी सूत्रसंचालन केले तर कु. प्राप्ती आलदर व शुभम लाडे यांनी शिक्षक दिनाविषयी
मनोगत व्यक्त केले,तर पवार सुप्रिया व प्राप्ती आलदर यांनी शिक्षकांसाठी क्विझ कॉम्पिटिशन व जादूई प्रयोग घेतले.
आठवीतील विद्यार्थिनी कु. पूर्वा दौंडे हिने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्री. पंचाक्षरी स्वामी श्री. समाधान खांडेकर, मिस. वनिता बाबर,मिस. शितल बिडवे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रूपनर, संचालिका सौ. सारिका रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनीही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…