भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा.सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धीरज घाटे (वय.46,रा.स्नेह नगर वृंदावन निलायम टॉकीजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेफ्रॉन हॉटेल नवी पेठ शास्त्री रोड परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाटे शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी येथील शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षिरसागर हा देखील त्याच्या काही साथीदारांसोबत तेथे आला होता. घाटे यांचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर संपर्क ठेवत नाहीत, बरोबर जात नाहीत म्हणून तो मागील काही दिवसापासून रागात होता.
दरम्यान आगामी कालावधीत होणार्या महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.
याबातची माहिती घाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा प्रकार समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही संशियतांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…