तलाठ्याचा मदतनीस लाच घेताना रंगेहात पकडला
पंढरपूर तालुक्यातील घटनेने महसूल विभागात खळबळ
पंढरपूर (प्रतिनिधी) ः पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावच्या तलाठ्याकडे असणार्या मदतनीसाला, १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना, सोमवारी पंढरपूर तालुक्यात घडली. लाचलुचपत खात्याने केलेल्या या कारवाईत संबंधित मदतनीस ज्ञानेश्वर साळुंखे (वय ५०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ही लाच कोणासाठी स्वीकारली, हा मुद्दा उपस्थित झाल्यास या कारवाईचे लोन तलाठ्यापर्यंत पोहोचणार असल्याने, महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेळवे गावच्या तलाठ्याचा खाजगी सहाय्यक, ज्ञानेश्वर साळुंखे रा. भंडीशेगाव ता. पंढरपूर, हा लाचलुचपत विभागाच्या कारवाईत रंगेहात सापडला आहे. गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी येथील एका शेतकर्याने जमीन खरेदी केली होती. याबाबतची नोंद सातबारा उतार्यावर होण्याकामी त्याचा संपर्क या मदतनीसाबरोबर आला होता. ही नोंद झाल्याचे बक्षीस म्हणून, आणि शेतकर्याने फेडलेल्या कर्जाचा बोजा उतार्यावरून कमी करण्याकामी, या शेतकर्याकडे एक हजार रुपयांची मागणी संबंधित ज्ञानेश्वर साळुंखे याने केली होती. याबाबत जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार करण्यात आली होती . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची पडताळणी केली होती. सोमवार दि.६ सप्टेंबर रोजी शेळवे येथील बसस्टॉपवर त्याने शेतकर्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही लाच घेताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. याबाबत त्याच्यावर पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे घडलेल्या या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, अंमलदार सोनवणे, स्वामी, जानराव, सणके आणि सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली.
चौकट
भ्रष्टाचारासाठी अधिकार्यांकडून होतोय मदतीनिसाचा वापर सुरक्षितरित्या भ्रष्टाचार करून मोठे घबाड लाटण्याकामी, महसूल विभागातील प्रत्येक अधिकार्याकडे खाजगी सहाय्यक कार्यरत आहे. नागरिकांकडे पैशाची मागणी करण्यासाठी, या मदतनीसांचा वापर अधिकार्यांकडून खुबीने केला जातो. आपले काम करून घेण्यासाठी नागरिकही या सहाय्यकास गुल करून, काम करून घेताना आढळतात. मदतनिसांने केलेला अपहार हा, त्या अधिकार्यासाठीच केलेला असतो, याबाबत शंका असण्याचे कोणतेही कारण सध्यातरी अस्तित्वात नाही. असे असताना लाचलुचपत विभागाकडून खाजगी सहाय्यकावर कारवाई झाल्यास, त्याचा अधिकारी कसा काय वगळला जातो? याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…