महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत फॅबटेक कॉलेजच्या डी. फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली. फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शै.वर्ष २०१९-२० पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या डी.फार्म व बी.फार्म या विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या निकालामध्ये प्रथम वर्ष कु.यळसंगी मीनाक्षी ही विद्यार्थिनी ८१.५५ % गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु.धनश्री जाधव ८१.०० % गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तर कु. सुप्रिया काशीद ८०.६४ % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्णझाली आहे. द्वितीय वर्ष निकालामध्ये सचिन हट्टाळी ८९.५० % प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कु.रेश्मा शिंदे ८९.४० % गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु.निकिता होटगी ८८.०० % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, संचालक प्रा.अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले. मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म व इतर सोयी-
सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन लेक्चरर्स तसेच प्रॅक्टिकलचे व्हिडिओज बनवून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल समजण्यास सोपे गेले आहे. तसेच ग्रंथालयाच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवण्यात आली. याबरोबरच पीडीएफ स्वरूपात जर्नल्स व पुस्तके देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.
महाविद्यालयास पीसीआयची अंतिम मान्यता नुकतीच मिळाली आहे. हि मान्यता भेटल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी स्टोअर करीता नोंदणी करता येते व सरकारी नोकरी मिळण्यास ते पात्र होतात. यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल विशेषतःजिल्हा व जिल्ह्याबाहेरून हा फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी कडे आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात प्रा. सर्फराज काझी, प्रा. सूरज कांबळे, प्रा.सुरज मणेरी, प्रा.मिस. प्रियांका कारंडे, प्रा. मिस अश्विनी झाडे, प्रा.मिस.मोना तांबोळी, प्रा. मिस. गोपिका डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…