ताज्याघडामोडी

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घटना घडली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा रिक्षाचालकानी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटनेत रेल्वेचे कर्मचारी असलेल्या कामगारांनी देखील सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे पुण्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

३१ ऑगस्टला सदर पिडीत मुलगी कामानिमित्त पुणे स्टेशन येथे आली होती

सदर १३ वर्षीय मुलगी पिडीत मुलगी ही आई वडिलांसोबत वानवडीमध्ये राहते. ३१ ऑगस्ट रोजी मुलगी पुणे स्टेशन येथे कामानिमित्त आली होती. मात्र, तिला त्याचठिकाणी रात्री उशीर झाल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिथेच उभा असलेल्या एका रिक्षाचालकाने तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो असं सांगून तिला विश्वासात घेतलं. आणि वानवडी येथे घेऊन गेला आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. अगोदर सदर पिडीत मुलीवर सहा रिक्षाचालकानी बलात्कार केला. आणि तिला तिथेच डांबून ठेवण्यात आलं. एक तारखेला पुन्हा रेल्वेचे कर्मचारी असलेल्या २ चतुर्थश्रेणी कामगारांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याने तिची पकृती अतिशय गंभीर असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिडीतेचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशनला येणार होता

दरम्यान, पिडीत मुलीचा मित्र दुसऱ्या गावावरून तिला भेटण्यासाठी ३१ ऑगस्टच्या रात्री पुणे स्टेशनला येणार होता. मित्र येणार असल्याने ती देखील पुणे स्टेशनला गेली होती. मात्र, बराच वेळ मित्राची वाट पाहून देखील तिचा मित्र आला नाही. आणि मित्राची वाट पाहता पाहता रात्र झाली होती. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का? याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणाकरून रिक्षात बसवून घेऊन गेला.

रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं

पिडीतेला रिक्षाचालकाने घेऊन गेल्यावर त्याने त्याच्या काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर घटनेत तब्बल ६ रिक्षाचालक सहभागी होते. अशी देखील माहिती समोर आली आहे. या, घटनेनंतर दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यानी देखील पिडीतेवर अत्याचार केला. अत्याचार करून, सदर मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आलं होतं. त्यादरम्यान पुन्हा आणखी या मुलीवर कुणी अत्याचार केलाय का याचा तपास पोलीस करत आहेत.

१ तारखेला वडिलांनी मुलीच्या हरवल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे दिली होती

३१ तारखेला अपहरण झालेली मुलगी ५ तारखेला पोलिसांना मुंबईला जाताना आढळून आली. आरोपींनी तिला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं होतं. दरम्यान, सदर पिडीत मुलीच्या वडिलांनी अगोदरच म्हणजे १ तारखेला मुलीच्या हरवल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे दिली होती. तिचा शोध घेत असताना रेल्वे स्टेशनहून ती रिक्षात बसल्याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली होती.

मुलीला चंदीगडहून घेतलं ताब्यात

पोलिसांना लोकेशन मिळाल्यावर पोलिसांची टीम चंदीगडला विमानाने गेली आणि तिला ताब्यात घेतलं आहे. सदर आरोपींनी पिडीत मुलीला मुंबईला पाठवलं होत. तिथे तिला भेटला, त्यानंतर ते दोघे चंदीगडला गेले होते. तपास करत असताना स्टेशन वरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून रिक्षात बसताना दिसली. त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याने तेव्हाच पोलिसांना बलात्कार केल्याची माहिती दिली पोलिसांनी आरोपींना अटक केली. शेवटी पोलिसांनी तांत्रिक तपास करून मुलीला शोधलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago