शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी करुन रस्त्यातच नाचत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड परत येत होते. यावेळी देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्याजवळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्राफिक जाममधून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध ‘पोलीस’ अशी पाटी असलेली MH28 AN 3641 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारसमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. संजय गायकवाड यांनी हा प्रकार पाहिला. गायकवाड यांनी पोलिसांना चांगलच धारेवर धरलं. एवढच नव्हे तर गायकवाड यांनी एका पोलिसाच्या कानाशिलात देखील लगावली.
त्यानंतर, ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यधुंद असलेल्या पोलिसांनी तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
दरम्यान, या घटनेवर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार हा पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचं म्हणत जे अधिकारी यात दोषी आहेत त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून तात्काळ त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…