महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुषाचा इतिहास या राज्याला आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करतात.
पण शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कृती करणं जास्त आवश्यकता आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे पुण्यात एका महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याची लाजिरवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाती सविस्तर माहिती समोर आलेली नाही. कदाचित या प्रकरणात महिला सरपंचाची चूकही असू शकते. पण लसीकरण केंद्रावर चार चौघात कायदा हातात घेऊन महिलेला मारहाण करणं हे आक्षेपार्हच आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या ग्रामीण भागात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने महिला सरपंचाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असं आहे. तर मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असं आहे.
महिला सरपंचाची पोलीस ठाण्यात तक्रार
याप्रकरणी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोप महिला सरपंचाने पोलीस तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यात तो महिलेला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यकर्त्यावर नेमकी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसेच पोलीसही नेमकी काय कारवाई करतात? हे आगामी काळात लक्षात येईल.
ठाण्यात महिला अधिकाऱ्यांवर फेरीवाल्याचा हल्ला
तीन दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान 30 ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…