राज्यात सर्वाधिक लाचखोरी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सर्वाधिक कारवायात वरचा क्रमांक लागतो तो भाऊसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची संख्या मोठी आहे.दस्त नोंदणीच्या मार्गाने मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.मालमत्ता खरेदी अथवा विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर त्या मालमत्ताच्या ७/१२ अथवा सर्व्हे क्रमांक असलेल्या खाते उताऱ्यावर नावाची नोंद होणे आवश्यक असते.
मात्र मुद्रांक शुल्क भरून घेतले आणि दस्त नोंदणी केली कि पुढे फेरफार नोंदीसाठी मात्र तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचा अनुभव अनेकांना येतो.अनेक वेळा या नोंदीसाठी भरमसाठी लाचेची मागणी केली जाते अन्यथा नोंद अडवली जाते असा अनुभव अनेकांना येतो. मात्र अशा प्रकारे लाचेची मागणी झाल्यास थेट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे काही धाडसी लोक पुढे येत असल्याने अनेक लाचखोर भाऊसाहेबास बेड्या पडल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड वरकुटे येथील तलाठी थेट अनिल नरळे हा तलाठी कार्यालयात बसूनच लाचखोरी करत असल्याचे कारवाईत आढळून आले असून एका शेतकऱ्याच्या बहिणीचे व त्याचे नाव वारस नोंद करण्यासाठी ३ हजार लाचेची मागणी करत २ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
आता थेट तलाठी कार्यलयात लाच घेताना सापडलेल्या या तलाठ्यास शिक्षा होते कि लाचलुचपत विभागाकडून करण्यात येणाऱ्या बहुतांश कारवायात जसे आरोपी निर्दोष सुटतात तसे हाही तलाठी कोर्टात निर्दोष सुटणार याकडे लाचखोरीच्या चीड असणाऱ्या लोकांचे लक्ष लागले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…