गुन्हे विश्व

पत्नी, सासु-सासऱ्यासह मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

 

कुटुंबातुन वेगळे राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या पत्नीसह तिच्या आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी धनकवडीत घडली.

शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा.दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी प्रियांका भोसले, सासु रोहिणी शंकर भोसले (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय 56) व मेव्हणा मनीष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय 27, सर्व. रा.कवडीपाट, लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भोसले (वय 58) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शरद भोसले यांचे धनकवडी येथे हॉटेल होते. त्यांचा 2017 मध्ये प्रियांकाशी विवाह झाला होता. ते पत्नी, मुलगी व आई-वडीलांसह धनकवडीमध्ये राहात होते. पत्नी प्रियांका हि तिच्या आई- वडीलांच्या सांगण्यावरुन पतीच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी अट्टाहास करीत होती. त्यावरुन त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरू होती. पत्नीने या प्रकाराबाबत तिचा भाऊ गणेशला सांगितले. गणेशने भांडणे मिटविण्यासाठी भोसले यांना मार्केट यार्ड येथे बोलावले. त्यानंतर त्यांना तेथे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर गणेशने पुन्हा शरद व त्यांच्या वडीलांना हडपसर येथील हांडेवाडी परिसरात बोलावून दोघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून शरद भोसले यांनी त्यांच्या धनकवडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago