कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे हे भक्तीस्थळावरील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून उदगीरकडे निघाले होते. महादेव वाडीजवळ याच दरम्यान त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला आणि महादेव वाडीजवळ त्यांना अडविण्यात आले. आरोपींनी कीर्तनकार शिवानंद यांना भक्तीस्थळावर पाऊल ठेवल्यास खून करू असे म्हणत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे लॉकेट,मोबाईल काढून घेण्यात आले व गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या अशा आशयाची फिर्याद कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महादेव धोंडे (रा. बाजीराव शिवडी, जि. नांदेड), शुभम घोडके, नागेश माचुनदरे, हणमंत लांडगे (लोहा जि. नांदेड), सूर्यकांत आणेराव (बेन्नाळी ता. लोहा), कपील भालके (लोहा जि. नांदेड), गोविंद आणेराव (लोहा. जि. नांदेड), राजकुमार मालवडे (अहमदपूर), प्रा. विश्वंभर स्वामी, गुरूराज स्वामी (अहमदपूर) यांच्यासह 13 जणांवर कलम 327, 324, 323, 143, 147, 149, 504, 506, 427 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक हे करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…