राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. या महिलेने दगडफेक का केली या संदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…