पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल
नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.तर काही ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय त्याच्याच शेतात वाळूचा साठा करून खेपा मिळल तसे वाळू उचलली जाते.काही ठिकाणी त्या शेतकऱ्यास काही पैसे देऊन गप्प केले जाते मात्र काही ठिकाणी अशा बेकायदेशीर बाबीस सहकार्य करण्यास शेतकरी तयार होत नाही तेव्हा त्याला दमदाटी प्रसंगी मारहाणीस देखील सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षात सातत्याने घडले आहेत.
असाच प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला असून आंबे तालुका पंढरपुर येथील शेतकरी संभाजी सदाशिव शिंदे वय-49 वर्षे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शेतातुन नदीकडे जाणारा रोडवरुन गावातील तानाजी शिंदे व इतर लोक चोरुन नदीपात्रातुन वाळु वाहुन नेत असल्याचे फिर्यादीस कळताच त्यांनी शेतातील नदीकडे जाणारा कच्चा रोड दगडे टाकुन बंद केला.त्यानंतर परस्पर तानाजी शिंदे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी फिर्यादीच्या शेतातील वाटेवर टाकलेली दगडे काढुन टाकल्याचे व पुन्हा चोरुन वाळु वाहत असल्याचे समजले.बाबत फिर्यादीने दि.29/08/2021 रोजी पोलीस ठाणेशी संपर्क साधुन चोरुन वाळु वाहतुकीबाबत माहिती दिली.त्यामुळे चोरुन वाळु वाहतुक बंद पडली होती.त्यामुळे ते लोक फिर्यादीवर चिडुन होते. दि.
31/08/2021 रोजी मला सकाळी 10/00 वाजता फिर्यादीस ग्रामपंचायती जवळ बोलविण्यात आले.त्यावेळी वाट अडवणारा शेतकरी संभाजी शिंदे हे तेथे गेले व वाळुसाठी वाट चालु ठेवणार नाही असे सांगताच पाठीमागुन तानाजी शिवाजी शिंदे यांने संभाजी शिंदे यांच्या कानाच्या पाठीमागे हाताने जोरात ठोसा मारला त्यानंतर लागलीच त्याचे चोरुन वाळु वाहतुक करणारे गावातील साथीदार बापु शिवाजी शिंदे,हरि शिवाजी शिंदे,निशाल बापु शिंदे,विकास बापु शिंदे,धनाजी उध्दव शिंदे,शंकर राजाराम शिंदे,सिध्दु सुरेश नागणे,आनंदा जनार्ध सगर,बाबुराव मनोहर जाधव यांनी फिर्यादीस खाली पाडुन हाताने,लाथ्थाबुक्याने मारण्यास सुरुवात केली.
जमलेल्या लोकांनी सोडवा-सोडवी केल्यानंतर फिर्यादी मुलगा दिपक असे मोटार सायकलवरुन घडल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेकडे येत असताना पाठीमागे तानाजी शिवाजी शिंदे हा त्याची फरच्युनर चार चाकी गाडी नं.एम.एच.14 इ.डब्ल्यु1111 यामधुन त्यांचा पाठलाग करीत होता.गाडीतील तानाजी शिवाजी शिंदे हा त्याचा चालक सिध्दु नागणे यास घाल याच्या अंगावर गाडी ,सोडु नको,खल्लास कर असे मोठ्याने ओरडुन म्हणत असल्याचे फिर्यादीने ऐकले त्यामुळे घाबरुन वेगाने मोटारसायकलवर चळे पाटीजवळ आले असता त्यावेळी पाठीमागे असलेली फॉर्च्युनर गाडी फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला चारीत गेली.