गुन्हे विश्व

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या.

जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक प्रशांत मोहन कांबळे (भूकरमापक वर्ग-3) याला पकडले. कार्यालयाच्या आवारात पथकाने ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी कांबळे याच्या विरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. यामध्ये आरोपी कांबळे एसीबीच्या जाळ्यात सापडला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

7 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago