महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येऊन काम बंद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्यावतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सह कार्यअध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना सुनील वाळूजकर यांनी सांगितले की, दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू यादव नावाच्या फेरीवाले कडुन धारदार शास्त्रने त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे.* आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरणं होणार आहे होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणेसाठी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणेसाठी या घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात येत असून आज संपूर्ण कामकाज बंद करण्यात आले असल्याचे सांगितले यावेळी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष किशोर खिलारे, जयंत पवार, अनिल गोयल, नागनाथ तोडकर, गुरू दोडिया,महावीर कांबळे, दशरथ यादव, विठ्ठल वाघमारे, दत्तात्रेय चंदनशिवे, संजय माने, संभाजी देवकर, चिदानंद सर्वगोड,नेताजी पवार, सुवर्णा डमरे, प्रज्ञा देशमुख, अस्मिता निकम, राणी गायकवाड व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…