कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले.
खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव परिसरात हि घटना घडली आहे. एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करून आल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
तुषार माणिकराव साठवणे असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. त्याने वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू अस तुषार यांनी सांगितलं होतं. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला. सावकाराकडून सारखी अपमानस्पद वागणूक देण्यात येत होती. त्यामध्येच दुकानाची आवक बंद असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या तुषार यांनी अखेर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
29 ऑगस्टला तुषारची पत्नी पूनम साठवणे हिने अवधुतवादी पोलिसांत सावकार पलूमवार विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ताटी पलूमवार विरुद्ध गुन्हा दाखल केला. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या कमाईचा मार्ग बंद झाला. व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आले. यामुळे नागरिकांना कर्जासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. याचा सावकारांनी वाटेल तसा गैरफायदा घेतला. कित्येक लोकांच्या मालमत्ता हडपण्यात आल्या. तरीदेखील सावकारांच्या दादागिरी मुळे तक्रार देण्यास सामान्य माणूस पुढे येत नव्हते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…