माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपाने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला तसेच देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते.याबाबत मी वारंवार बोलत आलो आहे. मात्र आता त्यांना प्राथमिक अहवालातून क्लिनचिट देण्यात आली आहे. खरंतर या सगळ्यामागे खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगच असून त्यांनाच आता गजाआड करा अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
गेल्या सहा महिन्यांपासून मी वारंवार अनिल देशमुख निर्दोष आहेत याबाबत सांगत आलो आहे. मात्र आता तर ते खरे झाले आहे. खंडणीबाबत कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाहीये असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
याउलट परमबीर सिंग यांनीच वाझे यांना नोकरीत समावेश करून घेत मोठ्या पदाची जबाबदारी दिली. शिवाय ते सातत्याने वाझे यांना घेऊनच वरिष्ठ मंत्र्यांबरोबरच अधिकाऱ्यांकडे सुद्धा ब्रिफिंगसाठी जात होते.
शिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती, त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंगच जबाबदार असल्याचेही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे निर्दोष असून त्यांना यामध्ये अडकवून त्यांना त्रास देण्यात आला, असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…