गुन्हे विश्व

माझ्या खेपा का तोडल्या म्हणत भोसे ग्रामपंचायतीच्या ठेकेदारास क्रिकेट स्टंपने बेदम मारहाण

पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीने काढलेल्या रस्त्याच्या मुरूम भरणीच्या कामाचा ठेका घेतलेले जेसीबी मालक  अतुल विलास कदम यास भोसे ग्रामपंचायत मधिल सोऴपट्टी रस्त्याचे मुरूम भरून खड्डे भरण्याचे टेंडर मिळाले होते. 27/08/2021 रोजी अतुल कदम यास नांदोरे येथील पांडुरंग भिंगारे याने फोन करत माझ्या खेपा का तोडल्या म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व भोसे पाटी येथे येण्यास सांगितले व पुन्हा शिवीगाळी करून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नंतर सांयकाळी 6/45 वा. चे सुमारास मी फिर्यादीच्या शेतातील मळ्याजवळ येवुन फिर्यादी JCB मधिल कँबिनमध्ये बसुन मोबाईलवर बोलत असताना चार मोटार सायकलवर लोक आले व मोटार सायकल रस्त्यावर लावुन जेसीबीच्या दिशने चालत८ इसम हातामध्ये स्टंप व लाकडी दांडके घेवुन JCB च्या दोन्ही दरवाजातुन वर चढले व शिवीगाळी दमदाटी कर लागले. त्यामध्ये पांडु भिंगारे याने फिर्यादीस तु उद्यापासुन भोसे येथे ये असे म्हणुन त्याचे हातातील स्टंपने व इतर लोंकाकडे लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर, तोंडावर व दोन्ही हातावर मारहाण केली व त्यातील दोन इसमांनी पोटात लाथा मारल्या आहे. त्यावेळी पांडु भिंगारे याने स्टंपने मारहाण करून डोके JCB चे कँबिन मधिल दरवाजाच्या लोखंडी पट्टीवर आपटले त्यामुळे फिर्यादी अतुल विलास कदम याच्या नाकातुन रक्त आले.

फिर्यादी अतुल कदम याने आरडो-ओरड केल्याने ते लोक JCB च्या दरवाज्यातुन खाली उतरले. तर JCBच्या खाली असलेल्या दोन इसमांनी दगड फेकुन मारल्याने ते दगड फिर्यादीच्या डोक्यास लागले आहेत.ओरडण्याचा आवाज ऐकु आल्याने तेथे रमेश ज्ञानोबा कदम, दत्तात्रय सत्यवान कदम, कैलास कोंडाबा कदम, पत्नी- प्रिती अतुल कदम, वडील- विलास लिंबा कदम, आई-आशा विलास कदम, नंदा शंकर पाटील पळत आले. त्यानंतर पांडुरंग भिंगारे व त्याचे सोबत आलेले लोक तेथुन पळुन जावुन मोटार सायकल वरून निघुन जाते वेळी सुधीर देशमुख यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते लोक पळुन गेले अशा आशयाची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago