ताज्याघडामोडी

करकंब पोलिसांची कारवाई पेहे येथे जुगार खेळणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

करकंब पोलिसांची कारवाई
पेहे येथे जुगार खेळणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू व उपनिरिक्षक महेश मुंडे यांनी एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले होते.पथक तयार केल्याप्रमाणे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत प्राथमिक केंद्र शाळेच्या पाठीमागे महादेव मंदिराच्या समोर जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर करकंब पोलिसांनी तात्काळ मोटर सायकल वर पेहे येथे जाऊन जुगार खेळणाऱ्या वर कारवाई केली. यावेळी पोलीस हवालदार आर. आर. जाधव., बी. एच. घोळवे, पोलीस नाईक सज्जन भोसले, दयानंद हजारे, यांनी तत्काळ मोटरसायकलवर जाऊन येथील गावामध्ये जुगार खेळणारे इसमावर कारवाई केली असता या जुगार खेळणाऱ्या सात इसमासह सात मोटर सायकली, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सह एकूण १,७८,३५०/-रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. या जुगार खेळणाऱ्या पैकी अजून आठ इसम पळून गेलेले आहेत. त्यांची नावे निष्पन्न झालेली आहेत. पेहे, नांदोरे ,नेवरे या गावातील पंधरा-इसमावर जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दयानंद हजारे हे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago