ताज्याघडामोडी

कोरोनाची लागण झालेल्यांवर कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआर

सध्या देशात कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु आहे. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत.

दरम्यान लसीचे नेमके किती डोस घ्यावेत याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. आता आयसीएमआरच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये तेवढाच Antibody Response दिला आहे, जितका कोरोनाची लागण न झालेल्या लोकांना दिलेल्या दोन डोसद्वारे मिळाला होता.

शनिवारी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये आयसीएमआरचा हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, जर या प्राथमिक निष्कर्षांना मोठ्या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये पुष्टी मिळाली तर, पूर्वी SARS-CoV-2 ची लागण झालेल्या लोकांना BBV152 लसीचा एकच डोस दिला जाऊ शकतो, जेणेकरून मर्यादित लस साठ्यामध्येही जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते. भारतातील पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचे BBV152 असे कोडनेम आहे. जानेवारीमध्ये या लसीला आपातकालीन वापरासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली.

4-6 आठवड्यांच्या अंतराने ही दोन डोसची लस दिली जाते. अभ्यासात, कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या अँटीबॉडी प्रतिसादाची तुलना अशा लोकांशी केली गेली, ज्यांना कधीही कोरोनाची लागण झाली नाही. चेन्नईमधील लसीकरण केंद्रांवर फेब्रुवारी ते मे 2021 दरम्यान BBV152 लस घेणारे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या अभ्यासाला ICMR-NIRT च्या आचार समितीने मान्यता दिली आहे.

तीन टाइम पॉइंट्सवर अँटीबॉडीची पातळी मोजली गेली. पहिले म्हणजे लसीकरणाच्या दिवशी (बेसलाइन), दुसरे म्हणजे पहिल्या डोसनंतर एक महिना आणि त्यानंतर पहिल्या डोसनंतर दोन महिन्यांनी. दोन अपवाद वगळता, पूर्व-कोरोनाची लागण झालेल्या जवळजवळ सर्व लोकांमध्ये लसीकरणाच्या वेळी शोधण्यायोग्य प्रतिपिंडे आढळली. पण हा पायलट अभ्यास असल्याचे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ लोकेश शर्मा म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

23 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago