ताज्याघडामोडी

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मिनाज मुलाणी आणि नेहा गायकवाड या विद्यार्थिनींना इन्स्पायर अंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर

पंढरपूर-श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी मिनाज सय्यद मुलाणी व नेहा शाहु गायकवाड या विद्यार्थिनींना दर वर्षासाठी ८०,००० रुपये प्रमाणे ५ वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभाग कडून जे विद्यार्थी इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होतात त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. विज्ञान शाखेमध्ये देखील चांगले करियर करण्याची संधी मिळावी या हेतूने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे इन्स्पायर  (इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूएट फॉर इन्सापयर्ड रिसर्च– आय.एन.एस.पी.आय.आर.ई.) ही स्कॉलरशिप दिली जाते. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या वाटेवर वळून स्थानिक व जागतिक गरजांच्या दिशेने संशोधन केल्यास त्यातून चांगले शास्त्रज्ञ व संशोधक निर्माण होतील. हाच या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश आहे. ‘विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासून विज्ञानातील अभ्यासाची गोडी लावून संशोधन वृत्ती वाढीला लावण्याचा मुख्य उद्देश असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देशात निर्माण होईल.’ अशी माहिती ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी पुणे विभागीय बोर्डाकडून मिळालेल्या पत्राच्या माध्यमातून दिली. या विद्यार्थिनींना चांगले गुण मिळावे म्हणून विज्ञान विभागाचे प्रमुख डी.ए.वायदंडे, शिक्षक एस.बी.पवार, एस.टी.पवार, एस.आय. गाढवे, एस. आय. शिंदे आदी शिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच. एम.बागल, उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, विश्वस्त, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

7 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago