ताज्याघडामोडी

सोलापूर डीसीसी बँकेचा कारभार आणखी काही प्रशासकाच्या हाती ठेवणेच गरजचे

नेतेमंडळीच्या सहकारी संस्था संस्थांना भरमसाठ कर्जे देऊन अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या संस्थांकडून वसुलीच होत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली होती.राजकारणात पुढारी म्हणून वावरणाऱ्या अनेकांनी हि बँक भाकड होई पर्यत पिळून खाण्याचा प्रकार केला आणि असुदे आपलाच आहे म्हणत जिल्ह्याचे,राज्याचे नेते म्हणून वावरणाऱ्या,विविध पक्षात वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळत पदे पदरात पाडून घेणाऱ्या बँकेच्या काही आजी माजी संचालक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर डीसीसी बँक मरणासन्न होताना केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.त्याचीच परिणीती म्हणून शेवटी या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून या बँकेवर तीन वर्षांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आणि हळूहळू बँकेचा कारभार सुधारत गेला.पुन्हा ठेवी वाढत चालल्या आणि काही प्रमाणात कर्जवसुलीही होऊ लागली.काही नेत्यांनी भंगारात काढलेल्या सहकारी संस्थांची विक्री करण्यात आली आणि बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात कमी झाला.परंतु याचा खऱ्या अर्थाने फटका बसला तो बँकेच्या नियमित कर्जदार असलेल्या सामान्य शेतकऱ्यांना.       

१५ दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्याचे ठराव मागिवण्यास सुरवात झाली असतानाच गावपातळीवरील वर्षानुवर्षे सोसायटीचे चेअरमन असलेली मंडळीही खुश झाली होती.तर राजकीय पातळीवर जिल्हा बँक आपल्याच ताब्यात असली पाहिजे अशी राजकीय धारणा असलेले नेतेमंडळीही कामाला लागली होती.     

मात्र आता फायद्यात आलेली डीसीसी बँक आपल्याच ताब्यात असावी असा हेतू असणाऱ्या जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांना राज्य शासनाने धक्का दिला असून कोरोनाचे कारण पुढे करत व आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेली सोलापूर डीसीसी बँक आता कुठे प्रशासकाच्या कठोर धोरणामुळे अडचणीतून बाहेर पडत असताना लगेच निवडणूक घेणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन या बँकेची निवडणूक स्थगित केली आहे.शासनाने आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मार्च २०२१ अखेरचा संचित तोटा १६२ कोटी असल्याचे नमूद करत शेती व बिगर शेती कर्जाची वसुली करूनच हा तोटा कमी केला जाऊ शकतो.याच बरोबर कर्ज वसुलीसाठीच्या आणखी काही उपाययोजनांसाठी या बँकेवर प्रशासकच आणखी काही काळ कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

54 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago