ताज्याघडामोडी

खासदार संभाजीराजे 2 सप्टेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती.

त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवार, दि. २ सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून दिली.

यावेळी, खासदार संभाजीराजे यांनी आपल्यासोबत राष्ट्रपतींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने त्यांचा एक खासदार प्रतिनिधी पाठवावा, यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना व गटनेत्यांना पत्र पाठवून आवाहन केले असल्याचेही संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने हि भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांचेसोबत आपले प्रतिनिधी म्हणून कोणास पाठवतात, याकडे लक्ष लागले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago