ताज्याघडामोडी

“बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर”

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केलाय.“मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,” अशी सडकून टीका गोपीचंद पडळकर यांची राऊतांवर केली.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईवर कारवाई का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल? असा सवाल आ.गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago