केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी महाड येथील पत्रकार परिषेदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत काढलेल्या वादग्रस्त उद्गाराने काल संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या.राज्य भरात शिवसेनेकडून राणेंच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आल्याचे दिसून आले.पंढरपूर शहरातही शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी चौक येथे नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शहर प्रमुख रवी मुळे यांच्यासह शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांवर पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक अभिमन्यु गरड यांनी या बाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून शिवसेना पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी हिरालाल शिदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधिर अभंगराव, पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे यांचेसह इतर 8 ते 10 पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांचे छायाचित्र असलेले पोस्टरला चपला मारून निदर्शने आंदोलन करून सदरचे छायाचित्र पोस्टर जाळले.संसर्गजन्य अजाराचा फैलाव होवू नये याकरीता कोणतीही खबरदारी न घेता मास्क किंसा सोशल डिस्टंन्स न ठेवता मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधीकारी सो सोलापूर यांचे जमावबंदी आदेश जा. क्र. 2021/डीसीबी/2/प्र.क्रं.1/आरआर 3923,दि.14/08/2021प्रामणे आदेशाचे उलंघन केले आहे. म्हणुन माझी सरकारतर्फे त्यांचे विरूध्द भा.दं.वि.का. क. 188, 269 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…