पंढरपूर कडून एक वाहन वाळू भरून भोसे हद्दीत येत असल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह ताब्यात घेत करकंब पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1), 4(क)(1) नुसार कलम 21 अन्वये २ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सदर वाहनाचा चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
या बाबत करकंब पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संदिप दत्तात्रय गिरमकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 23/08/2021 रोजी 17/00 वा. चे सुमारास पोलीस नाईक गिरमकर व पोहेक/247 हरिहर,पोहेक/1070 राजकर, पोना/1672 शेटे असे पोलीस ठाण्यात हजर असताना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पंढरपूर येथुन एक अशोक लेलंड वाहन वाळु भरुन भोसे हद्दीत येत आहे.सदर माहिती मिळताच हे पोलीस कर्मचारी भोसे ता. पंढरपूर या गावचे शिवारात करकंब ते पंढरपूर रोडवरील बाळासाहेब राजाराम माळी रा. भोसे ता. पंढरपूर यांचे पेट्रोल पंपावर थांबुन राहीलो असता थोडयाच वेळात पंढरपूरकडुन एक बदामी रंगाचे अशोक लेलंड वाहन येवुन शिवनेरी ढाब्याचे डावे बाजुन वळुन कनल पट्टीचे रोडने जावु लागले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. चालकास पोलीस आल्याचा संशय आल्याने चालक वाहन उभा करुन ऊसाचे शेतातुन पळुन गेला.
पकडलेले वाहनामध्ये एक इसम मिऴुन आला त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव किरण लक्ष्मण लोंखडे वय 23 वर्षे रा गादेगाव ता पंढरपुर असे असल्याचे सांगितले.तर पळून गेलेल्या चालकाचे नाव विनायक असल्याचे सांगण्यात आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…