फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*स,
सांगोला :फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. एच.एस.सी बोर्ड परीक्षा २०२१ मध्ये कॉलेजचा निकाल १०० % लागला आहे. यावेळी सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करण्यात आली. बारावीतील प्रथम क्रमांक कुमारी नांगरे अमृता सुरेश, द्वितीय क्रमांक घाडगे ऋतुजा सदाशिव व तृतीय क्रमांक जास्मिन बशीर पटेल या सर्व विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व गुणपत्रिका देऊन संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी फॅबटेक पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी व इंजीनियरिंग क्षेत्रातील माहिती सांगितली. फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी फार्मसी विभागाची माहिती सांगून कोरोणाच्या काळातील औषध निर्मिती शास्त्राचे महत्त्व सांगितले.
त्याचप्रमाणे फॅबटेक कॉलेजचे अकॅडमिक डीन प्रा.टी एन जगताप यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. डॉक्टर कणसे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरचे मार्ग सांगितले. प्रा. पराग दौंडे व प्रा. संजय पवार यांनी फॅबटेक कॉलेजमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स याची माहिती व वाढते तंत्रज्ञान याविषयीची माहिती दिली. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री भाऊसाहेब रुपनर यांनी कॉलेजमधील विविध शाखा व तंत्रज्ञानाकडे होणारी वाटचाल या विषयाची माहिती देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व व यशस्वी जीवनासाठीचा मार्ग याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वनिता बाबर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सुदर्शन भंडारे यांनी केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेहि सहकार्य लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…