ताज्याघडामोडी

ओझेवाडी वि.का.सोसायटी सचिवास जातीवाचक संबोधन

ओझेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव नवनाथ भिकाजी पाटोळे, वय -46 वर्ष , धंदा-नोकरी रा.पंढरपूर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बंक देखरेख संघ अंतर्गत सचिव पदावर नोकरीस असुन शेतीपिकाची पाहणी करून शेतीपुरक कामाकरीता ठरावाप्रमाणे कर्ज रक्काम संबंधीत कर्जदारांना वितरीत करणे, वसुली करणे तसेच लेखजोखा ठेवणे आदी कामे पाहतात.ओझेवाडी, ता.पंढरपूर गावातील शेतकरी शहाजी अण्णासाहेब नागणे याने त्याचे शेतातील ऊस शेती पिक कर्ज रक्कम मिळणेकरीता ओझेवाडी गावातील विविध कार्यकारी सोसयटीचे संचालक मंडळाकडे अर्ज करूनसुध्दा मला कर्ज मिळाले नाही अशी  तक्रार नमुद करून मा. सहा. निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर यांचेकडे तक्रारी अर्ज दिलेला होता.

त्याची सुनावणीची दुसरी सुनावणी तारीख दिनांक दि. 23/08/2021 रोजी होती.सदर सुणावणी कारवाई चालु असताना शहाजी नागाणे यांची बाजु ऐकुन घेवून त्याबबात संस्थेमार्फत अँड. श्री.जाधव हे म्हणणे सादर करत होते. असे काम चालु असताना सदरची सुनावणी अंतीम टप्प्यात आली असताना दुपारी 1.00वा.च्या सुमारास तक्रारी अर्जदार शहाजी अण्णासाहेब नागणे यानी फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करत अपमानकारक जातीवाचक बोलून सर्व उपस्थित संचालक मंडळ व शासकीय अधिकारी यांचेसमक्ष पान उतारा केला आहे अशा आशयाची फिर्याद दाखल केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

58 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago