गुन्हे विश्व

कपडे खरेदी करून आलोच म्हणत सालगड्याने पळवून नेली स्प्लेंडर

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी आहे आणि त्याचा प्रत्यय अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.मात्र तरीही सालकरी गडी मिळणे म्हणजे मोठे दिव्य समजले जाते.त्याला उचल देणे,त्याला वर्षाचा माल भरून देणे,त्याची राहण्याची सोय करणे,त्याला दूधदुभतं खाण्यासाठी देण्याचे मान्य करणे आदी अनेक अटी लादणारे शेतमजूरही आढळून येतात पण शेती तर कसलीच पाहिजे,आणि त्यासाठी सालकरी गडी पाहिजे म्हणून अनेकवेळा सालगरी गड्याच्या साऱ्या मागण्या पुरवल्या जातात मात्र तरीही सालकरी गडी झटका देणार नाही अशी गॅरंटी नसते असेच मत अनेक शेतकरी व्यक्त करताना दिसून येतात.

मात्र याच वेळी काही प्रामाणिक सालकरी गडी हे वर्षानुवर्षे स्वतःची शेती समजून राबतात,मालकालाही सुखी करतात आणि आपणही सहकुटूंब सुखाने वर्षानुवर्षे त्याच मालकाकडे राहतात अर्थात मालकही तसाच दिलदार असेल तर.मात्र कधी कधी सालकरी गडी मधूनच पळ काढून निघून जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसून येतात.असाच प्रकार पंढरपुर तालुक्यातील बार्डी येथे घडला असून थेट स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन सालकरी गडी सहकुटूंब गायब झाल्याची फिर्याद शेतमालकाने दिली आहे.

या बाबत दाखल झालेल्या फिर्यादींनुसार बार्डी येथील शेतकरी ज्योतीराम महादेव लांडे शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजीविका चालवितात.त्यांची वडीलोपार्जीत मौजे बार्डी येथे आठ एकर शेती आहे.शेती कामासाठी एका सालगड्याची आवश्यकता असल्याने करकंब येथील बापु शिंगटे याच्याकडे कामास असलेल्या सलगड्यास महीन्याला 10000/- रुपये प्रमाणे शेतात सालगडी म्हणुन त्याचे कुटुंबासह दि.31/05/2021 पासुन कामास ठेवले. त्याची कनकंबा किराणा दुकानाची 4365/- उधारी भागवली. दि.08/06/2021 रोजी त्या सालगड्याने आम्हाला कपडे घ्यावयाची आहेत व पैश्याची गरज आहे असे सांगत फिर्यादी शेतकऱ्याकडून 5000/- रु घेतले करकंब येथुन कपडे घेवुन येतो असे सांगत कुटुंबासह शेतकऱ्याची हिरो होंडा स्पेल्डर माटोर सायकल एम एच 13 क्यु 5563 घेऊन गेला.तो अद्यापर्यत परत आला नाहीअशी फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

11 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

11 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago